उष्माघात _ उन्हामुळे मृत्यू का होतो ?

 उष्माघात


उन्हामुळे मृत्यू का होतो ?


आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो?


आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात.


घामाच्या रुपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यकआहे.


पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं.


- जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं.


शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!)


स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायू ही निकामी होतात.


रक्तातलं पाणी कमी झाल्या मुळे रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो.

माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.


उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे.


ऊष्माघात टाळा.


उन्हाचा पारा चढत आहे.  त्यामुळे उष्माघात टाळण्या साठी खालील उपाययोजना करा..

शेतातील कामे सकाळी ६ ते ११ व दुपारी ४ते ६.३० या कालावधीत करा.


काम करत असताना मध्ये मध्ये थोडावेळ थांबुन पाणी प्या.


शक्यतो सुती (काँटन) व पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा.


डोक्यावर रुमाल टोपी इत्यादीचा वापर करा.


आहारात ताक दही इत्यादीचा वापर करा. तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ, मद्यपान व मांसाहार टाळा.


कोल्ड्रींक ऐवजी लिंबु सरबत, नारळपाणी याचा वापर करा.


दुपारी ११ ते ४ पर्यंत काम, प्रवास टाळा.


लहान मुलांना, गरोदर मातांना, आजारी व्यक्तींना दुपारच्या वेळी बाहेर पडु देऊ नका.


अशक्तपणा,थकवा, ताप-उलट्या इ. लक्षणे आढळल्यास तत्काळ डाॕक्टरांचा सल्ला घ्या.


Comments

Popular posts from this blog

राजर्षी शाहू महाराज सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ

सुकन्या समृद्धी योजना

विश्वकर्मा योजना अवघ्या ५ टक्के व्याजाने लाखभर कर्ज